प्रमोद नैकेले /---
अचलपूर:- आज बळीराजाचा सच्चा मित्र बैल यांच्या पुजनाचा पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी वरूनराजाने सुध्दा पावसाचा वर्षाव करुन बळीराजाला शुभेच्छा दिल्या.
पोळा सण हा कृषीप्रधान देशात शेतकरी हा आधारस्तंभ आहे म्हणूनच त्यांना बळीराजा म्हणून संबोधले जाते.शेतक-यांचा सच्चा मित्र बैल याची शेतकरी या दिवशी बैलाची मनोभावे पूजा करतात.एक दिवस अगोदर शेतकरी आपल्या बैलांना जेवणासाठी आमंत्रित करतात,पोळ्याचे दिवशी त्यांचे स्नान घालून त्यांना सजवल्या जाते.त्यांना पुरणपोळी खायला दिल्या जाते गोडधोड खायला दिल्या जाते.सांयकाळी पारावर किंवा गावातील हनुमान मंदिराजवळ सर्व शेतकरी आपल्या बैलांना घेवुन जातो तेथे मानाचे बैलजोडीचे वाजतगाजत आगमन होवून सर्व बैलांचे पुजन करून महादेवाच्या आराधणेने तोरण तोडून पोळा फुटतो नंतर शेतकरी आपल्या बैलांना घरोघरी नेवून लोक त्यांचे पुजन करून दर्शन घेतात व मोठया उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतो.आज अचलपूर मध्ये चौखंडी,अब्बासपुरा व जगदंबदेवी मंदिर सरमसपूरा येथे नेहमीप्रमाणे पोळा भरवण्यात आला अमावस्या दोन दिवस असल्याने कोठे दुपारी तर कोठे संध्याकाळी पोळ्याचे आयोजन करण्यात आले परंतू सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या उत्साहाने सण साजरा करण्यात आला.
Friday, September 2, 2016
*अचलपूर मध्ये पोळा उत्साहाने संपन्न* *पावसाने सुध्दा लावली हजेरी*
Posted by vidarbha on 7:47:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment