प्रमोफ नैकेले /----
*अचलपुर*:- अचलपूर शहरामध्ये आमदार बच्चु कडू यांचे प्रयत्नाने 1 करोड़ 51 लाख निधि वापरून बनवण्यात आलेल्या पशु वैद्यकिया दवाखाण्याचे उद्दघाटन राज्य पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जाणकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री जानकर यांनी राज्य मध्ये कोठेच गोववंश करीता निधी कमी पड़ू देणार नाही तसेच त्यांनी म्हटले कि आपल्या शेतक-यांना शेती करीता प्रशिक्षण देणे आवश्यक आहे जर राज्याचे शेतक-यांना प्रशिक्षण दिले तर होणा-या आत्महात्या कमी होवू शकतात मेलघाट मध्ये अधिक प्रमाणात दूधाचे ऊत्पन्न होते जर येथील शेतक-यांना सुविधा प्राप्त झाली तर मेलघाट च्या दूधाचा लाभ शेतक-यासोबत संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला होवू शकतो.जर मनात काही करन्याची इच्छा असली तर कोणतेही लक्ष पूर्ण होते.मंत्री, आमदार, व अधिकारी पूर्ण ईमानदारी ने काम केले तर योजना साकार होऊ शकते. या कार्यक्रमामध्ये आमदार बच्चू कडू यांनी म्हटले की राज्यामध्ये गो वंश कायदा येण्यापूर्वी शेतकरी 14 वर्षापेक्षा मोठे जनावरांना वीकुन टाकायचे ज्यामुळे त्यांना पैसे मिळत होते पण आता ते जनावरांना विकू शकत नाही म्हणून त्यांना ते जनावर शेवटपर्यंत पाळण्याकरीता अनुदान मिळाले पाहिजे जेणे करून ते जनावरांना शेवटपर्यंत वागवू शकतील. यावेळी अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी म्हटले की अचलपूर मध्ये पशु वैद्यकीय दवाखाना बनला ही मोठी आनंदाची गोष्ट आहे याप्रमाणे मेलघाट मध्ये सुध्दा असे काम करने आवश्यक आहे. जर असेच विचार ठेवून काम केले तर मेलघाट मध्दे राहणारे गवळी समाजाचे लोकांना सुध्दा फायदा मिळू शकतो याप्रसंगी शहरातील सर्व गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Post a Comment