सांगली-- - पू.
संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेविषयी चुकीचे वृत्त छापणार्या दैनिक
लोकमतने चुकीचा खुलासा अत्यंत त्रोटक शब्दांत छापला असून या संदर्भात
कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठानचे सांगली शहर
कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिली. या संदर्भात श्रीशिवप्रतिष्ठानच्या
कार्यकर्त्यांनी दैनिक लोकमतच्या येथील कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या.
श्री. चौगुले पुढे म्हणाले की,
१. श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मुंबई येथील सभेसाठी दोन सहस्र धारकर्यांची उपस्थिती होती आणि सभाही सुरळीत पार पडली होती. सभा उधळणे, घेराव घालणे यांसारखे कोणतेही अपप्रकार येथे घडले नसतांना दैनिक लोकमतने खोटे वार्तांकन केले. २. या संदर्भात श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांनी २८ ऑगस्ट या दिवशी दैनिक लोकमतच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी तेथे झालेल्या चर्चेत संपादक मंडळाने आजच्या दैनिकात घडलेल्या घटनेविषयी खुलासा देत असल्याचे सांगितले होते.
३. प्रत्यक्षात २९ ऑगस्ट या दिवशी केवळ आम्ही निवेदन दिलेले वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यांच्याकडून काय चूक झाली, त्याचा खुलासा येणे अपेक्षित होते. यामुळे सर्व धारकरी संतप्त झाले असून आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा गांभीर्याने विचार करत आहोत.
४. याच समवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीविषयी असा अपप्रकार खपवून घेणार नाही, असे सांगितले.

Post a Comment