महानगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक
भावनांना पायदळी तुडवत अमोनियम बायकार्बोनेट वापरून गणेशमूर्ती विसर्जन
करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी
निर्बंध घालणारे पालिका प्रशासन ताबूत विसर्जनांच्या संदर्भात निर्बंध
घालण्याचे धैर्य दाखवील का ? हिंदूंच्या सणांच्या संदर्भात कुणाही
धर्माचार्यांचे मत विचारात न घेता असे धर्मद्रोही निर्णय घेणार्यांना
पदावर रहाण्याचा नैतिक अधिकार नाही. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा
अघोरी निर्णय घेणारे महापौर आणि आयुक्त यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे, असे
आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट
यांनी केले. ३१ ऑगस्ट या दिवशी महानगरपालिका भवनासमोर आयोजित करण्यात
आलेल्या निषेध आंदोलनात ते बोलत होते. या प्रसंगी विविध संघटनांच्या
प्रतिनिधींसह १४० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
श्री. घनवट पुढे म्हणाले, "प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लीटर सांडपाणी
नदीत सोडले जाते, तेव्हा महापौर आणि आयुक्त काय निर्णय घेतात ? हौदांचे
आर्थिक गणित जुळवण्यासाठी कृत्रिम हौदांच्या धर्मविरोधी संकल्पनेला
प्रोत्साहन दिले जाते; पण नंतर हौदातील गणेशमूर्ती खाणीत अथवा पुन्हा नदीत
सोडल्याचे आढळून येते. गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे
प्रदूषण होत नसतांना जलप्रदूषणाचा बागुलबुवा करत जर अशास्त्रीय आणि
अधार्मिक निर्णय भाविकांवर थोपवले जात असतील, तर ते सहन केले जाणार नाही."
Post a Comment