पुणे - हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार न करता
पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर हे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम
बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या हट्टाला पेटले आहेत. धर्मशास्त्रविरोधी
निर्णय घेणारे आयुक्त आणि महापौर यांचे डोके ठिकाणावर आहे का ?, असाच
प्रश्न विचारावासा वाटतो. आमच्या संस्कृतीवरचे असे आघात आम्ही कदापि सहन
करणार नाही. महापौर आणि आयुक्त यांना मनमानी कारभार करू देणार नाही.
महानगरपालिकेने काहीही निर्णय घेतला असला, तरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे
श्री गणेशमूर्तींचे नदीतच विसर्जन करणार, अशी खणखणीत चेतावणी भाजपचे आमदार
श्री. योगेश टिळेकर यांनी दिली. पुणे महापालिकेने श्री गणेशमूर्तींच्या
विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट, तसेच कृत्रिम हौद यांचा वापर करण्याचा
अशास्त्रीय निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ महापालिका भवनाच्या समोर ३१ ऑगस्ट
या दिवशी निषेध आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार श्री. टिळेकर बोलत
होते.
Post a Comment