बुलडाणा :- शिरसगांव देशमुख ग्रामपंचायत ता.खामगांव जि.बुलडाणा चे उपसरपंच बळीराम
तोताराम वानखडे यांचे विरुध्द़ लाचेची मागणी केल्याबाबत बुलडाणा येथील ॲन्टीकरप्शऩ
ब्युरोने कार्यवाही केली आहे. विजयराव नरेंद्र देशमुख रा.शिवाजीवेस ता.खामगांव यांनी
एसीबी कडे तक्रार नोंदविली होती की, त्यांचे मालकीचे वियलक्ष्मी लॉजीग व हॉटेल समोरील
जागेत पार्किग करीता टिन शेड उभारण्याकरीता शिरजगांव देशमुख ग्रा.पं.चे उपसरपंच बळीराम
वानखडे यांनी 2 लाख रुपयाची मागणी केली होती. सदर तक्रारीवरुन 25 जुलै रोजी पंचसमक्ष
पळताळणी कार्यवाही आयोजित केली असता पळताळणी दरम्यान उपसरपंच बळीराम वानखडे यांनी तळजोडीअंती
पहिला हप्ता 75 हजार रुपये लाचेची स्पष्ट़ मागणी केली . त्यानंतर 26 जुलै रोजी पैसे
स्विकारण्याचे ठरले होते. त्यावरुन सापळा कार्यवाही ची संक्षय आल्याने वानखडे यांनी
लाचेची स्विकारली नाही व लाच न स्विकारता निघुन गेले .त्यामुळे त्यांचे विरुध्द़ कलम
7,15 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 प्रमाणे लाच मागणी गुन्हा नोंद करण्यात आले
आहे.
Post a Comment