चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /----
चांदूर रेल्वे तालुक्याती वाई, राजना व दिपोरी येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी चांदूर रेल्वे येथे येतात. परंतु धामणगाव रेल्वे ते चांदूर रेल्वे दिपोरी मार्गे सकाळी बस नसल्यामुळे विद्याथ्र्यांची शैक्षणिक कोंडी होऊन मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे धामणगाव रेल्वे ते चांदूर रेल्वे दिपोरी मार्गे सकाळी बसफेरी सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुखाला दिलेल्या निवेदनातुन केली.
चांदूर रेल्वे ते धामणगाव दिपोरी मार्गावरील राजना, वाई, दिपोरी येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज चांदूर रेल्वे येथे येतात. परंतु त्यांना सकाळची शाळा पकडण्यासाठी बसच नसल्यामुळे शेकडो विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी धामणगाव रेल्वे ते चांदूर रेल्वे दिपोरी मार्गे सकाळी बसफेरी सुरू करावी अशी मागणी राजना, वाई, दिपोरी येथील विद्याथ्र्यांची आहे .समस्या त्वरीत न सोडविल्यास तिव्र आंदोलन छेडु असा इशारा पालक व विद्याथ्र्यांनी चांदूर रेल्वे आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातुन दिला. निवेदन देतांना दिपोरी येथील गुरूदेव सेवा मंडळाचे हेंमत टाले, पत्रकार प्रा.रवींद्र मेंढे सह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment