चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी २२ ऑगष्ट ते २ ऑक्टोंबर या कालावधीत कुटूंब स्तर संवाद अभियान सर्वत्र राबविण्यात येत आहे. या उपक्रम अंतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी शौचालय नसलेल्या प्रत्येक कुटूंबाकडे भेट दिली व चर्चा करून घरी शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत केले. या भेटी दरम्यान दोन कुटूंबानी शौचालय बांधकाम करण्याचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला.
भेटीगाठी स्वच्छतेसाठी या उपक्रमा अतंर्गत अमरावती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, चांदूर रेल्वे गटविकास अधिकारी सतिश खानंदे, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, जिल्हास्तरावरील सल्लागार प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, सरपंच अर्चना राठोड, दारासिंग राठोड, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा वर्वâर्स, पोलीस पाटील इत्यादी या अभियानात सामिल झाले होते. अभियान दरम्यान सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी शौचालय नसलेल्या प्रत्येक कुटूंबाकडे भेट दिली व शौचालय बांधण्यासाठी चर्चा करून २ ऑक्टोंबर पुर्वी शौचालय बांधण्याबाबत विंनती केली. भेटी दरम्यान दोन कुटूंब तयार होऊन सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे हस्ते शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी २ ऑक्टोंबर पर्यत गाव हागणदारीमुक्त करण्याची हमी दिली.
Post a Comment