पालिका कर्मचार्यांच्या दबावाला बळी न पडता भाविकांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधन मोहिमेस पाठिंबा !
Posted by
vidarbha
on
12:37:00 PM
in
|
फलटण (जिल्हा सातारा) - येथे हिंदु जनजागृती
समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर भाविकांनी पालिका
कर्मचार्यांच्या दबावाला बळी न पडता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात
विसर्जन केले. यशवंतराव माध्यमिक शाळेच्या पटांगणात फलटण नगरपालिकेने दोन
हौद बांधले होते. भाविक विसर्जनासाठी आल्यावर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी
तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करून त्यांना हौदात मूर्तींचे विसर्जन
करण्यास सांगितले. समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रबोधनानंतर, तसेच
'कर्मचार्यांनी भाविकांवर दबाव आणू नये', असे सांगितल्यावर सहस्रो
मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. केवळ २० ते २५ मूर्तींचे
कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा
उपप्रमुख श्री. दशरथ चांगण, श्री. माऊली चव्हाण, सातारा ग्राहक संरक्षण
कमिटीचे श्री. शैलेंद्र नलवडे, तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती तशाच ठेवून पालिकेचे कर्मचारी निघून गेले. समितीच्या कार्यकर्त्यांनीच नंतर त्यांचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.
Post a Comment