एका गावातील पर्यावरणवादी संस्थेने तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली
भाविकांना मूर्तीदान करणे सक्तीचे केले. संस्थेचे कार्यकर्ते भाविकांना
श्री गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यास विरोध करत होेते आणि
त्यांच्याकडून मूर्ती घेऊन नगरपरिषदेच्या गाडीत ठेवत होते. त्यांनी
साहाय्यासाठी २ पोलिसांनाही आणले होते. तेही भाविकांना विसर्जन करू देत
नव्हते. हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी एका पोलिसाला
भाविकांना मूर्तीचे पाण्यात विसर्जन करू देण्याविषयी सांगिल्यावर त्याने
सांगितले, 'मला तुमचे म्हणणे पटते; पण हे लोक आमच्यावर दबाव आणतात. यापुढे
श्री गणेशमूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यापासून मी कोणालाही अडवणार नाही'.
तथाकथित पर्यावरणवादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र मूर्तीदानाची मोहीम
चालूच ठेवली. समितीच्या कार्यकर्त्या भाविकांचे प्रबोधन करून त्यांना
धर्मशास्त्रानुसार मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यास सांगत होत्या. त्या
वेळी धर्मद्रोही संस्थेच्या महिलांनी येऊन त्यांच्याशी वाद घातला. बर्याच
जणांनी नाईलाजाने मूर्तीदान केले. विसर्जनाच्या ठिकाणी नगरपरिषदेने लाकडी कुंपण घातल्याने भाविकांना मूर्तींचे पाण्यात विसर्जन करता येत नव्हते.
Post a Comment