महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात रमेश शिंदे यांनी मांडले परखड सत्य !
मुंबई-- - ज्यांना आपण मदर तेरेसा
म्हणतो, त्या भारतियांच्या मदर नाहीत. त्या मिशनरी म्हणून हिंदूंचे
धर्मांतर करण्यासाठी भारतात आल्या होत्या. आपल्याकडे सिंधुताई सकपाळ
यांच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांची तुलना तेरेसांशी
होऊ शकत नाही. तेरेसा यांनी सामाजिक कार्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर
केले. गोव्यामध्ये इन्क्विझीशनद्वारे (ख्रिस्त्यांची धर्मसमीक्षणाची
पद्धत) हिंदूंचा अनन्वित अत्याचार करून हिंदूंचे धर्मांतर करणारा झेवियर
आणि सामाजिक सेवेच्या आड गरीब हिंदूंच्या असह्यतेचा लाभ उठवून त्यांचे
धर्मांतर करणार्या तेरेसा या एकाच माळेचे मणी आहेत. अशा पद्धतीने धर्मांतर
करणार्या किंवा धर्माचा प्रसार करणार्यांनी चमत्कार केल्याचे दाखले देऊन
पोपकडून संतपद दिले जाते. तेरेसा यांनी दोन चमत्कार केल्याचा जो दावा केला
जातो, ते दोन्ही चमत्कार खोटे आहेत, असे परखड प्रतिपादन मदर तेरेसा यांना
संतपद देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर
आयोजित चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश
शिंदे यांनी केले. या चर्चासत्रात महाराष्ट्र टाइम्सचे साहाय्यक संपादक
विजय चोरमारे, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे प्रमुख फादर वेन्सी डिलिमा
आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील सहभागी झाले
होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांनी केले.
मदर तेरेसांच्या संतपदाची सांगड चमत्काराशी घालणे हा भोंदूपणा आहे का?
या विषयावर हे चर्चासत्र घेण्यात आले होते. श्री. रमेश शिंदे यांनी
चर्चेच्या वेळी पुढील सूत्रे मांडली ...
१. तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतर हाच उद्देश होता. याविषयी
तेरेसा यांच्याबरोबर मिशनमध्ये काम केलेल्या सुझान यांनी स्पष्टपणे म्हटले
आहे.
२. मदर तेरसा यांच्याबरोबर काम केलेले डॉ. अरुप चटर्जी यांनी फायनल
वर्डिक्ट नावाच्या पुस्तकात तेरेसा यांच्या कार्यातील खोटेपणा स्पष्टपणे
मांडला आहे. रस्त्यावर उचलून कुठल्याही गरीबाला त्यांनी त्यांच्या
रुग्णालयात आणलेले नव्हते. उलट जेव्हा रुग्णांचा दूरध्वनी यायचा, तेव्हा
मदर तेरेसा यांच्या कार्यालयातील मिशनरी १०२ क्रमांकावर दूरभाष करा, असे
सांगायचे.
३. मिशनरींनी रुग्णवाहिकांचा वापर रुग्णांसाठी कधीच केला नाही. नन्सना एका
ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी या रुग्णावाहिकांचा वापर होत असे.
४. मिशिनरी हाऊसमध्ये स्वयंपाकघराची क्षमता ३०० लोकांची असतांना सहस्रो लोकांना भोजन देण्याची खोटी गोष्ट सांगितली जात होती.
५. तेरेसा यांच्या क्लिनिकमध्ये वेदनाशामक गोळ्या नसायच्या. त्या केवळ
अॅस्पिरिन या एकच गोळी सर्वांना द्यायच्या, असे तेरेसा यांच्या मिशनविषयी
अमेरिकेतून अभ्यास करण्यासाठी आलेल्या डॉ. रॉबिन फॉक्स यांनी उघड केले
आहे.
६. तेरेसा या बरे होऊ शकणारे आणि बरे होऊ न शकणारे अशा सर्वच रुग्णांना
एकत्रच ठेवायच्या आणि सर्वांना नेहमी तुम्ही इथे आल्यामुळे तुम्हाला
स्वर्गाचे तिकिट मिळणार, असे सांगायच्या. एखाद्या व्यक्तीची सेवा करायची
असेल, तर त्याला ख्रिस्ती बनवायची किंवा बाप्तिस्मा द्यायची काय आवश्यकता
आहे?
Post a Comment