वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा
डावीकडून श्री. गुरुराज प्रभु, सौ. प्राची जुवेकर,
श्री. जगजीतन पाण्डेय, अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र
त्रिपाठी आणि श्री. नीलेश सिंगबाळ
|
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी येथील रामलीला
मैदानावर हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता
श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु, रणरागिणी
शाखेच्या सौ. प्राची जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश
सिंगबाळ यांनी संबोधित केले.
गुलाबी क्रांती नष्ट करण्याची भाषा करणारेच गोरक्षकांना कारागृहात पाठवत आहेत !
- श्री. गुरुराज प्रभु, सनातन संस्था
३३ कोटी देवतांचा वास जिच्यात आहे, अशा गोमातांची आज रस्त्यांवर
दिवसाढवळ्या हत्या होत आहे. निवडणुकीपूर्वी गुलाबी क्रांती नष्ट करण्याची
भाषा करणार्यांनी गोहत्याबंदी कायदा केला नाही. उलट ते रात्रंदिवस गोरक्षण
करणार्या गोरक्षकांनाच कारागृहात पाठवण्याची सिद्धता करत असून नवीन
गुलाबी क्रांतीला प्रोत्साहन देत आहेत. देशात मंदिरांतील मूर्तींची तोडफोड
आणि चोर्या यांत वाढ होत आहे. त्यामुळे हिंदूंनी नवीन मंदिरे
बांधण्यापेक्षा त्यांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य स्वत:त निर्माण करणे
आवश्यक आहे.
देवींच्या मारक रूपांना धारण करण्यासाठी रणरागिणी शाखेचा प्रारंभ !
- सौ. प्राची जुवेकर, रणरागिणी शाखा
हिंदु धर्मात स्त्रियांना देवीचा मान दिला जातो; मात्र आज तिची
थट्टा करण्यात येत आहे. जेव्हा या पृथ्वीवर असुर वाढले आणि त्यांना रोखणे
देवांनाही अशक्य झाले, तेव्हा देवींनी अवतार धारण केले. आमच्याकडे धनसंपन्न
करणारी देवी लक्ष्मी, तर घरात अन्नाचा तुटवडा पडू न देणारी अन्नपूर्णा
देवी, तर आहेच, यांसह दुष्टांचा संहार करणार्या दुर्गा, डाकिणी, शाकिनी,
चंडीही आहेत. स्वसंरक्षणार्थ देवींच्या या मारक रूपांना धारण करण्यासाठी
आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेला प्रारंभ केला आहे.
हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांविषयी हिंदूंमध्ये विश्वास निर्माण होणे आवश्यक !
- हिंदुत्त्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी
हिंदु धर्मावर सातत्याने धार्मिक आघात होत आहेत. त्यामुळे आमच्या
अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. आधुनिकतेच्या प्रभावाखाली हिंदू हे
धार्मिक विधींशिवाय सण, उत्सव साजरे करत आहेत. त्यामुळे आम्ही धर्मापासून
दूर जात आहोत. आज धर्मरक्षण आणि धार्मिक आघाताच्या संदर्भात विनामूल्य
साहाय्य उपलब्ध होईल, असा विश्वास हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांविषयी
त्यांच्या जवळच्या हिंदूंमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करा !
- श्री. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
सर्व पक्षांचे नेते धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांचे
लांगूलचालन करत असून हिंदूंवर अन्याय करत आहेत. हिंदुत्वनिष्ठांना खोट्या
आरोपांखाली अडकवून त्यांना कारागृहात पिडा देण्यात येत आहे. हिंदूंच्या
नावावर निवडणूक जिंकणारे सरकारही त्यांना न्याय देण्यास इच्छूक नाही,
हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या होत आहेत, काश्मीर नंतर कैराना, आझमगड
येथूनही हिंदूंचे पलायन होत आहे, तरीही सत्ताधारी गप्प आहेत. आम्हाला
भारताला इस्लामिक स्टेट होऊ द्यायचे नाही; म्हणून भारताला हिंदु राष्ट्र
घोषित करण्याची घटनादत्त मागणी सातत्याने केली पाहिजे.
Post a Comment