चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
नगरपरीषदची रणधुमाळी सगळीकडे सुरू असतांना शुक्रवारी भारतीय जनता पक्षातर्फे ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
लांब प्रतिक्षेनंतर काही दिवसांपुर्वी शहरातील नगरपरीषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नगरसेवकांसाठी सर्व पक्षाकडे उमेदवारांची रिघ लागली होती. २४ तारखेपासुन सुरू झालेले उमेदवारी अर्ज गुरूवारपर्यंत केवळ २ अर्ज दाखल झाले होते. यानंतर शुक्रवारी भारतीय जनता पार्टीतर्फे बाळासाहेब सोरगिवकर, संजय मोटवानी आणि सौ. सारीका अभिजीत तिवारी यांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नगरसेवक पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केला. तिनही युवा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यकर्त्यांत जल्लोष, नवचैतन्य पहावयास मिळत आहे. याव्यतीरीक्त इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्यामुळे अनेक उमेदवार आज शनिवारी उमेदवारी दाखल करणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपाचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment