- पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची दोन चित्रपटगृहांसमोर निदर्शने !
- व्यवसायापेक्षा राष्ट्रभक्तीला प्राधान्य देणारे व्यावसायिक हवेत !
कोल्हापूर- पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांचे कोणतेही चित्रपट येथील सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका पतित पावन संघटनेने घेतली होती. त्यानुसार पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी पद्मा आणि पार्वती या चित्रपटागृहांच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यानंतर येथील पद्मा, प्रभात, शाहू, पार्वती, पी.व्ही.आर् या चित्रपटगृहांमध्ये ए दिल है मुश्किल या चित्रपटाचे चारपैकी केवळ एक खेळ बंद करण्यात आला आहे.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ...
या आंदोलनात पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री सुनील पाटील, उपाध्यक्ष आकाश नवरुखे, सतेज मांडवकर, वन्दे मातरम् संघटनेचे अध्यक्ष श्री. अवधूत भाटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी आदी ३० धर्माभिमानी सहभागी झाले होते.
सर्व खेळ बंद करण्यास
चित्रपटगृह मालकांचा नकार !
२८ ऑक्टोबर या दिवशी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर येथील पद्मा चित्रमंदिराच्या मालक सौ. इंगळे यांनी चित्रपटाचे चारही खेळ दाखवण्याचा निर्णय घेतला; मात्र याला हिंदुत्ववाद्यांनी विरोध दर्शवला. या मालकाने टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रातील वृत्त दाखवून चित्रपटाच्या पहिल्या खेळाचे उत्पन्न भारतीय सैन्यदलास देणार असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी या चित्रपटाचा एकतरी खेळ बंद करावा, अशी मागणी केली; मात्र ही मागणी सौ. इंगळे यांनी अमान्य केली. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतल्याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी पद्मा चित्रमंदिराचे व्यवस्थापक यांना गांधीगिरी पद्धतीने हिंदुत्ववाद्यांनी हार घातला. या वेळी पद्मा चित्रपटमंदिरासमोर हिंदुत्वनिष्ठांनी जोरदार निदर्शने केली. सर्व खेळ बंद करण्यास चित्रपटगृह मालकांनी नकार दिला आहे. पतित पावन संघटना पाकिस्तान कलाकारांच्या चित्रपटांना विरोध करते. जे भारतीय सैनिक पाकच्या आक्रमणात हुतात्मे झाले आहेत, त्यांच्यासाठी ही एक श्रद्धांजली आहे, अशी भूमिका संघटनेने या चित्रपटाविषयी घेतली आहे, असे संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
चित्रपट पहाण्यास येणार्या प्रेक्षकांना झेंडूची
फुले दिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पहाण्याचे टाळले !
पद्मा या चित्रपटगृहात ए दिल है मुश्किल हा चित्रपट पहाण्यास जाणार्या ९-१० प्रेक्षकांना झेंडूची फुले देण्यात आली. या वेळी त्यांना तुम्ही पाकिस्तानच्या कलाकारांचा चित्रपट पहाणार असल्याविषयी फूल भेट देत आहे, असे त्यांना सांगितले. त्यानंतर फूल भेट दिलेले ४-५ प्रेक्षक थोड्या वेळाने चित्रपटगृहातून बाहेर पडले. त्यांनी आपल्याकडील फूल परत हिंदुत्ववाद्यांना दिले. त्यानंतर चित्रपटगृहात प्रेक्षक जाणे बंद झाले.
Post a Comment