स्वस्तिकाच्या आकारातील फटाका |
- अन्य धर्मियांच्या धार्मिक चिन्हांचे फटाके सिद्ध करण्याचे धाडस कुणी दाखवेल का ?
- स्वस्तिक जळून जात असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर
मुंबई-हिंदूंचे शुभचिन्ह असलेल्या स्वस्तिकाच्या आकाराच्या भुईचक्राचे फटाके बाजारात विक्रीसाठी ठेवल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहेत. कोपरखैरणे येथील एका दुकानात असे फटाके आढळले. या भुईचक्राला स्वस्तिकाचा आकार देण्यात आला असून भुईचक्र लावल्यावर स्वस्तिक जळून जातेे. अशा प्रकारे हिंदूंसाठी पवित्र असलेल्या स्वस्तिकाच्या चिन्हाचा अवमान होत आहे. याविषयी हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी श्रीकृष्ण, श्रीविष्णु, लक्ष्मी आदी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके बाजारात विक्रीसाठी आढळत होते. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केल्यास धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा प्रविष्ट होऊ शकतो. याविषयी प्रशासनाकडून परिपत्रक काढण्यात आले असून पोलिसांकडूनही ठिकठिकाणी व्यापारांना तसे फटाके विक्री न करण्याची सूचना दिली आहे. याचप्रमाणे हिंदूंचे धार्मिक चिन्ह असलेले स्वस्तिक चिन्ह जळून जाणेे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. त्यामुळे अशा प्रकारे विक्री करणार्या फटाके विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
Post a Comment