BREAKING NEWS

Saturday, October 29, 2016

देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! - प्रमोद मुतालिक यांचे आवाहन एकसंबा (जिल्हा बेळगाव)

एकसंबा येथे श्रीराम सेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. प्रमोद मुतालिक
     एकसंबा (जिल्हा बेळगाव)-- हिंदु राष्ट्र घडवण्याचा संकल्प वेगळा आहे. देशामध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. असे करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. देशामध्ये भक्तीचा अतिवापर झाला आहे. त्यापेक्षा सक्तीचा वापर झाला असता, तर काश्मीर मिनी पाकिस्तान झाले नसते. काश्मीरप्रश्‍नी हिंदूंची भूमिका प्रखर नाही. त्यामुळे भारतातच काश्मीरमध्ये हिंदूंवर अधिक अत्याचार झाले. आज ५० सहस्र मुसलमानांनी लक्षावधी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले, तेच उद्या १ लक्ष होतील, तेव्हा अंतर्गत युद्धाला पुन्हा सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. एकसंबा येथील दत्त मंदिर येथे २६ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेना शाखेमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
   ते पुढे म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून श्रीराम सेनेद्वारे दुरावत असलेल्या हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला. हिंदु संघटना बनवणे काळाची आवश्यकता बनली होती. हिंदुत्व टिकवण्यासाठी कर्नाटकातील ३० पैकी २६ जिल्ह्यांमध्ये श्रीराम सेनेच्या शाखा आहेत. राज्य आणि ग्रामीण भागामध्ये ३ सहस्रांहून अधिक पदाधिकारी कार्यरत आहेत. ८ गोशाळा आणि १८ व्यायामशाळा स्थापन केल्या असून राज्यभरात २५ सहस्र गोहत्या थांबवण्यात आल्या आहेत. लक्षावधी हिंदु महिलांना संरक्षण दिले. देशभक्तीसह हिंदुत्व भक्ती प्रत्येकामध्ये रुजवण्याचे कार्य श्रीरामसेनेकडून करण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री बसवराज कल्याणी, उदयसिंग रायजाधव, ओंकार गायकवाड, विजय भावे, गजानन कट्टीकर, संतोष वस्त्रद, अमित पाटील, शुभम सांगावे, सतीश म्हेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.