मुंबई - राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने (मूक) मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आता हा (मूक) मोर्चा २० नोव्हेंबरला नवी देहलीत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जंतरमंतर ते महाराष्ट्र्र सदनापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा आयोजन समितीने २८ ऑक्टोबर या दिवशी दिली.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायदा रहित करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. नवी देहलीतील मोर्च्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात येेणार आहे.
http://www.marathakrantimorcha.org/
Post a Comment