दुकानासमोर मेड इन चायनाचे फटाके मिळत नाहीत, अशा आशयाचा फलक
लावून ग्राहकांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करणारे महेश भाटवडेकर !
श्री. महेश भाटवडेकर यांच्यासारखे राष्ट्राभिमानी आता सर्वत्र हवेत !
ए-वन ट्रेडर्स या फटाक्यांच्या दुकानात
ग्राहकांना विनंती आणि आवाहन
करण्यासाठी लावण्यात आलेला फलक
|
लांजा- - येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाक्यांचे दुकान असलेले श्री. महेश भाटवडेकर यांनी त्यांच्या दुकानाबाहेर फटाक्यांच्या संदर्भात सर्व ग्राहकांना विनंती आणि आवाहन करणारा फलक लावला आहे. या फलकावर निषेध ! निषेध !! निषेध !!! सर्व ग्राहकांना विनंती आहे ... आमच्याकडे शत्रूराष्ट्राला मदत करणार्या राष्ट्राचे (Made in China) फटाके मिळत नाहीत आणि तुम्हीही ते खरेदी करू नयेत, असे लिखाण केले आहे.
हिंदु जनजागृती समितीही चिनी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबवत आहे. याच उद्देशाने समितीचे डॉ. समीर घोरपडे हे फटाक्यांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी श्री. महेश भाटवडेकर यांच्याकडे गेले असता श्री. भाटवडेकर यांनी त्यांनी या संदर्भात केलेली वरील कृती सांगितली. श्री. भाटवडेकर म्हणाले, समितीने हे निवेदन दिले, हे बरे झाले. त्यामुळे आम्ही केलेली कृती योग्य असल्याची पोच मिळाली.
Post a Comment