जळगाव जामोद / राहुल निर्मळ
जळगाव जामोद नगर पालिका निवडणूक प्रचारार्थ दि २४ नोव्हेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. सदर सभेचे आयोजन हे दुपारी २ वाजता बसस्टँड परिसरात मोदी ग्राउंड मध्ये करण्यात आले होते या प्रसंगी मा . मुख्यमंत्री हे म्हणाले देशाचे प्रधान मंत्री मा . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बदलत असून जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुठे यांच्ये नेतृत्वात जळगाव जामोद शहर बदलत असल्याचे प्रतिपादन केले त्या मुळे नगर पालिकेवर पुन्हा भाजपाला सत्तेवर आणा व सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान त्यांनी जनतेला केले .यावेळी जिल्ह्याचे पालक मंत्री भाऊसाहेब फुंडकर ,आ डॉ .संजय कुठे ,भाजपा जेष्ठ नेते घनश्याम गांधी ,जानराव देशमुख ,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .सीमाताई डोबे ,सचिन देशमुख , रामदास बोंबटकर ,व सर नगर सेवक पदाचे उमेदवार हे उपस्थित होते .झालेल्या सभेला जळगाव जामोद वासियांनी मोठ्या संखेने हजेरी लावली .
Post a Comment