![]() |
श्रीफळ वाढवतांना श्री. संजय गुजराथी आणि समवेत महापौर सौ. कल्पना महाले |
धुळे - येथे धर्मरथात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. येथील महानगरपालिकेजवळील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ २४ नोव्हेंबर २०१६ या दिवशी दुपारी १२ वाजता धुळे महानगरपालिकेच्या महापौर सौ. कल्पना महाले यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करण्यात आले. शिवसेना नगरसेवक श्री. संजय गुजराथी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष श्री. कुणाल चौधरी उपस्थित होते. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत हेही उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर सौ. कल्पना महाले म्हणाल्या, "सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ अधिकाधिक हिंदूंनी घ्यायला हवा. " शिवसेना नगरसेवक श्री. संजय गुजराथी म्हणाले, "मी माझे सर्व मित्र आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना स्वत: हे प्रदर्शन पहाण्यासाठी घेऊन येईन." हे प्रदर्शन २५ नोव्हेंबरपर्यंत चालू राहील.
Post a Comment