अमरावती-(शहेजाद खान) -
विदर्भकन्या रूख्मिणीचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे ८ ते १९ नोव्हेंबरपर्यंत कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवानिमित्त दैनंदिन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात हरिपाठ, काकडा, सामुदायिक प्रार्थना, कलश स्थापना, अभिषेक आदी कार्यक्रम होतील. या उत्सवानिमित्त १५ नोव्हेंबरला दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी सकाळी कौंडण्यपुरात आलेल्या सर्व पालखींची नगर प्रदक्षिणा काढली जाईल. यावेळी हभप रंगराव महाराज टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप ज्ञानेश्वर महाराज पानसे यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा आयोजित होईल.
पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांना सुधीर दिवे यांच्यातर्फे नाश्ता वितरीत केला जाईल. त्यानंतर श्री गुरूदेव सेवामंडळ, गुरुकुंज मोझरी यांचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. सकाळी सर्मथ आकाजी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम होईल. पश्चात अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते ४ वाजता काल्याचे कीर्तन होईल. यावेळी पांडुरंग महाराज साळुंखे कीर्तन करतील. सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रतिष्ठान, आवीच्यावतीने सामूहिक प्रार्थना व खंजिरी भजनांचा कार्यक्रम होईल.

Post a Comment