
डावीकडून श्री. दुलाल सरदार, श्री. विकर्ण नस्कर, श्री. चित्तरंजन सुराल आणि बोलतांना श्री. उपानंद ब्रह्मचारी |
दक्षिण २४ परगणा (बंगाल)- आज हिंदु समाज जात, भाषा, आरक्षण, राजकीय पक्ष आदींच्या माध्यमांतून विखुरलेला आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या कल्याणासाठी संघटितपणे कार्य करणार्या हिंदूंची संख्या पुष्कळ अल्प आहे. सध्याची हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी केले. ते येथील पालबाडी गावात आयोजित ग्रामसभेत बोलत होते. या वेळी ‘हिंदु एक्झिस्टन्स’ या वृत्तसंकेतस्थळाचे संपादक श्री. उपानंद ब्रह्मचारी, धर्म उत्थान समितीचे संस्थापक श्री. विकर्ण नस्कर आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. दुलाल सरदार यांनीही मार्गदर्शन केले. या सभेचा लाभ २०० ग्रामस्थांनी घेतला. यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
सभेच्या प्रारंभी श्री. प्रताप हाजरा यांनी सांगितले की, देशातील सर्व समस्यांचे मूळ धर्मशिक्षणाचा अभाव आहे. आपल्याला मंदिरांच्या माध्यमातून धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल.
श्री. विकर्ण नस्कर म्हणाले, ‘‘नमाजपठण न करणारा काफीर असतो आणि त्याची हत्या करावी, असे म्हटले जाते, तेव्हा असे म्हणणार्यांबरोबर सर्वधर्मसमभाव कसा ठेवता येईल ? हा सर्वधर्मसमभावाचा खोटेपणा आहे.’’
श्री. उपानंद ब्रह्मचारी म्हणाले, ‘‘आज सर्व देश विकासाच्या मार्गावर चालत आहेत. अशा वेळी तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट देण्याची प्रथा अजूनही चालू आहे. जर मुसलमान पती-पत्नी यांच्यात तलाक झाला आणि त्यानंतर त्यांना वाटले की, आपण परत एकत्र संसार करूया, तर त्या महिलेला दुसर्या कोणाशी तरी विवाह करून काही काळानंतर घटस्फोट घेऊन पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो. याला ‘निकाह हलाला’ म्हणतात. हलालासारख्या प्रथा असणारे किती प्रगतीशील आहेत, याचा विचार केला पाहिजे.’’
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंत देवनाथ म्हणाले, ‘‘आज प्रसारमाध्यमे स्वार्थापोटी पक्षपाती बातम्या दाखवतात. यासाठी आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवून परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. तसेच राष्ट्र-धर्म यांसाठी वेळ दिला पाहिजे.’’
क्षणचित्र
मार्गदर्शनाच्या प्रारंभी श्री. उपानंद ब्रह्मचारी म्हणाले, ‘‘सनातन धर्मातील संत शिरोमणींना दिशा देणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना माझा नमस्कार!’’
Post a Comment