रामनाथी, गोवा येथील सनातनच्या
आश्रमात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ !
![]() |
दीपप्रज्वलन करतांना प्रा. कुसुमलता केडिया, डावीकडून
|
रामनाथी- नैसर्गिक आणि भौगोलिक प्रतिकूलता असल्याने युरोपमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. १९ व्या शतका पूर्वीपासून युरोप हा खुनी संघर्षाची प्रार्श्वभूमी असलेल्या आदीवासी जमातींचा समूह होता. या भागांत निसर्ग आणि भौगोलिक प्रतिकूलता असल्याने कृषी, औद्योगिक, अन्न धान्य यांची निर्मिती अल्प होते. त्यामुळे युरोपमधील लोकांना अन्नधान्यासाठी उष्ण कटिबंधातील देशांवर अवलंबून रहावे लागते. त्या तुलनेत निसर्गाची देण लाभलेला भारत सांस्कृतिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या विकसित होता आणि आजही आहे. त्यामुळे युरोपातील प्रमुख राष्ट्रांना पुढील काळात मोठी क्षमता असलेल्या भारताशी मैत्री केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे प्रतिपादन भोपाळ येथील धर्मपाल शोधपीठाच्या संचालिका तथा अर्थशास्त्रतज्ञ प्रा. कुसुमलता केडिया यांनी केले.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेला २५ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ झाला. शंखनाद झाल्यानंतर प्रारंभी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ; अर्थशास्त्रतज्ञ प्रा. कुसूमलता केडिया; हिंदु धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचे गाढे अभ्यासक प्रा. रामेश्वर मिश्र आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या शिबिरात देशभरातील संपादक, प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच वक्ते मिळून ६० जण उपस्थित होते.
धर्मपाल शोधपीठ (भोपाल) आणि संतकृपा प्रतिष्ठान (गोवा) यांच्या वतीने या वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. या कार्यशाळेत अभिजीत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, दैनिक सनातन प्रभातचे समूहसंपादक श्री. शशिकांत राणे हे या वेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्री. चेतन राजहंस यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रा. कुसुमलता केडिया यांनी युरोपातील संस्कृतीचे प्रमुख प्रवाह आणि हिंदु दृष्टीने मीमांसा या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री. चेतन राजहंस म्हणाले, सध्या समाजात मोठ्या प्रमाणात वैचारिक ध्रुवीकरण होत आहे. या दृष्टीने या शिबिराचे महत्त्व आहे. विचारांची शुद्धी करण्यासाठी अध्ययन, अध्ययनानंतर उचित चिंतन केले पाहिजे. सनातन धर्माच्या चक्षूंनी चिंतन केल्यास आपले चिंतन योग्य रितीने होणार आहे. राष्ट्राला महान राष्ट्र होण्यासाठी राजकारण, सैन्य, संस्कृती यांचा अभ्यास करायला हवा. लोकांमध्ये शौर्य जागरण करण्यासाठीचे माध्यम आपण बनले पाहिजे.
Post a Comment