![]() |
विडी घरकुल येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे आणि समोर उपस्थित समुदाय |
![]() |
संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे (डावीकडून दुसरे) यांना सभेचे अंक आणि निमंत्रण देतांना समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट (उजवीकडून तिसरे) |
सोलापूर - संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार असून येथील धर्मजागृती सभेला पुष्कळ प्रमाणात उपस्थिती लाभण्यासाठी आमच्या १२५ शाखांमध्ये धर्मसभेला येण्याविषयी निमंत्रण पोचवू, असे आश्वासन सोलापूर येथील संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत डांगे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सभेचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली असता ते बोलत होतेे. या वेळी समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते.
विडी घरकुल येथील महिला मेळावा
लव्ह जिहादच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु महिला
आणि मुलींनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! - सौ. अनिता बुणगे
आणि मुलींनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! - सौ. अनिता बुणगे
क्षणचित्रे
१. मेळाव्याचा प्रारंभ महिलांना कुंकू आणि पुरुषांना टिळा लावून झाला.२. या वेळी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.
सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने ४ डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळावे, बैठका आणि वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून प्रसारास वेग आला आहे. समाजातूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
Post a Comment