बुलढाणा- - येथील स्वर्गीय निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याप्रकरणी आदिवासीमंत्री विष्णु सावरा यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केली असून त्यांनी आश्रमशाळेची मान्यता रहित केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात १७ आरोपींवर गुन्हे प्रविष्ट केले असून १५ आरोपींना अटक केली. त्यातील ११ आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
१. मंत्री सावरा यांनी सांगितले की, विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकार्यांचा समावेश असून समिती राज्यभरातील आश्रमशाळांचीही पाहणी करणार आहे.
आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार गेल्या अनेक मासांपासून चालू असल्याचा कयासही व्यक्त केला जात आहे.
शाळेला अनुदानापोटी लक्षावधी रुपये मिळत असतांनाही येथील विद्यार्थी मात्र विविध सुविधांपासून वंचित आहेत.

Post a Comment