रामनाथी (गोवा)-
- सनातन संस्थेचा राष्ट्र आणि धर्म या क्षेत्रातील नावलौकिक माहीत असतांना मानहानी करण्याच्या हेतूने मंगळुरू (कर्नाटक) येथून प्रसिद्ध होणार्या कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’च्या संपादकांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यास अडचण काय?’ या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय लेख दैनिक वार्ताभारतीच्या २५ ऑक्टोबर २०१६ दिवशीच्या अंकात पृष्ठ ६ वर प्रसिद्ध केला. त्यामुळे संस्थेची अपकीर्ती झाली आहे. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्याकरवी दैनिक ‘वार्ताभारती’चे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक ए.एस्. पुथिगे आणि मालक द कम्युनिटी मिडिया ट्रस्ट यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
‘हानीभरपाईची रक्कम नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या मुदतीत न दिल्यास फौजदारी कारवाईसह हानीभारपाईची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थेला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे भाग पडेल आणि तसे करावे लागल्यास दाव्याचा खर्च अन् होणार्या सर्व परिणामांस आपणास उत्तरदायी धरण्यात येईल’, अशी समज या नोटिशीतून देण्यात आली आहे. तसेच या कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment