BREAKING NEWS

Saturday, November 5, 2016

4 अवैध रेती वाहतुक ट्रकावर दंडात्मक कारवाई - 2 लाख 24 हजार रुपये दंडाची वसुली


चांदूर रेल्वे तहसीलदार यांची कारवाई

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--


चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी अवैध रित्या क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक करणारे 4 ट्रक पकडुन त्यांच्यावर 2 लाख 24 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमूळे अवैध रेती वाहतुकदारांना धडकी भरली आहे.
यवतमाळ जिल्हयातुन 2 ब्राॅस क्षमतेपक्षा जास्त रेतीची वाहतुक करतांना 4 ट्रक चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी चांदूर रेल्वे ते देवगाव रस्त्यावर धनोडी येथे व चांदूर रेल्वे ते अमरावती रस्त्यावर तल्लई माथ्यावर पकडुन कारवाई केली. त्यामध्ये अमरावती येथील रफीकभाई यांचा ट्रक एमएच 31/डब्ल्यु-4473ए संतोष सुधाकर सरवरे यांचा ट्रक क्र. एमएच 27/एक्स-5300ए शेख समीर शेख गिलानी यांचा ट्रक क्र. एमएच 40/एके 0601 व अख्तर रमजान कालीवाले, रा. अमरावती यांचा ट्रक क्र.एमएच 40/7199 यांच्यावर प्रत्येकी 61 हजार रुपये प्रमाणे एकूण 2 लाख 24 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मंडळ अधिकारी दिलीप इंगळे, विलास वाढोणकर, तलाठी राजेश मलमकर, प्रल्हाद पल्ले, मुकिंद सुडके व कोतवाल विश्वेश्वर पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.