अचलपूर:- प्रमोद नैकेले /--
कोन मारणार बाजी सर्वत्र उत्सुकता
महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका आता जवळ येऊन ठेपल्या
सर्व राजकीय पक्षांनी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित केले व तसे नामांकन सुध्दा भरण्यात आले.अचलपूर नगरपालिका ही अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असून या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.काँग्रेस,भाजपा,शिवसेना व प्रहार यांच्यात चौरंगी लढत जवळपास निश्चित आहे.अखेर बाजी कोण मारणार याची उत्सुकता मतदारात लागली आहे.
अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील नगर पालिका निवडणूकीचा रंग चढत चालला आहे.यावर्षी येथे १९ प्रभागातून ३९ नगरसेवक व थेट जनतेतून नगराध्यक्ष
निवडल्या जाणार असल्याने निवडणूकीला एक वेगळीच रंगत आलेली आहे. प्रभाग १ ते १८ प्रभागात दोन नगरसेवक व एक नगराध्यक्ष तर प्रभाग १९ मध्ये तीन नगरसेवक व एक नगराध्यक्ष अश्या प्रकारे मतदारांना
मतदान करायचे आहे.केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्यामुळे नगरपालिकेत सुध्दा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.या निवडणूकीत भाजपने सिमा रूपेश ढेपे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उतरवीले आहे काँग्रेसने सर्वत अजूंम साजीद फूलारी,प्रहारने दिपाली महेन्द्र उर्फ बल्लू जंवजाळ तसेच शिवसेनेने सुनिता नरेंद्र फिसके असे चार दिग्गज उमेदवार एकमेकाविरूध्द उभे आहेत.एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता निश्चित झाली आहे.अपक्ष रूपाली अभय माथने,कल्पना नंतवंशी,जयस्वाल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.नगराध्यक्षासोबत नगरसेवक सुध्दा अश्याच चौरंगी लढतीत आहेत काही प्रभागात अपक्ष उमेदवारांची सरसी दिसत आहे.नगराध्यक्ष निवडणूकीत शहरातील विकासाचा मुद्दा महत्वाचा ठरणार
आहे शेवटी सरसी कुणाची होईल हे तर मतदार प्रत्यक्ष मतदान केल्यावर कौल कुणाकडे जाईल हे निश्चीत होईल.
Post a Comment