माहेरातून पैसे आणण्यास लावून पाजले फीनाईल
प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-अचलपूर कासद्पुरा निवासी युवती चा वीवह दर्यापूर येथील सुफी प्लाट निवासी नज़र खान हबिब खान याचे सोबत एक वर्षापूर्वी झाला.लग्नानंत युवती ला शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे सत्र पति, सासु,सासरा, नंणद व दिराने चालू केले मात्र माहेरच्या विवंचना व वडिलांच्या आजाराने तीने ही गोष्ट आपल्या परिवाराला सांगितली नाही आणि सासरच्या जाचाला सहन करत राहिली.मात्र यापेक्षा पुढे जाऊन सासरच्या लोकांनी त्या विवाहितेला संपवण्याचे दृष्टीने फ़ीनाइल पाजून जिवानिशि मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट जेंव्हा आईवडील व नातेवाईक यांना समजली तेंव्हा त्यांनी दर्यापूर पोलिस स्टेशन ला पूर्ण हकीकत सांगितली यावर पोलिसांनी 498अ 34 अनुसार पति नज़र खान ,सासू, सासरा हबिब खान असद खान, नणंद व दिर साहित सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला.यामध्ये विशेषतः ही की पोलिस या अरोपिंना फरार दाखवत असून मुलीची सासू स्थानीक असद्पुरा दर्यापूर प्रभागातुन नगरपालिका निवडणूक लढत आहे.प्रश्न हा सुध्दा चर्चेत आहे की जी आपल्या घराला जोडून ठेवू शकत नाही,आपल्या सुनीला सुन न समजता एटीएम मशीन समजून माहेरून पैसे आणण्यास छळ करते ती वार्डाच्या इतर माहिलांना त्यांचे अधिकार कसे मिळवून देईल.याप्रकरणात पोलिसावर अत्याचार ग्रस्त महिलेच्या वडिलांनी अारोपिंना सुट देण्याचा आरोप लावून एस.पी.व अल्पसंख्यक आयोग कडे तक्रार करुन योग्य न्याय मिळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.महिला सुरक्षेबाबत शासन जागृत असतांना पोलीस प्रशासनाने असे वागून अत्याचा-यांना पाठीशी घालणे योग्य नाही असे जनमाणसात बोलल्या जात आहे.
Post a Comment