पुणे :-
पुण्यात राज्यातील पहिले अनोखे आगळेवेगळे मेकअप सौंदर्य संमेलन पार पडले . सौंदर्य विश्वच्या.राज्यातील हे पहिले अनोखे मेकअप संमेलन सौंदर्य विश्वच्या संचालिका नीलिमा भोसले यांनी आयोजित केले होते.
मेकअप क्षेत्रात महिलांसह पुरुषांनीही येऊन आधुनिक तंत्रप्रणालींचा वापर करून या क्षेत्रात अधिक कौशल्य व नैपुण्य आत्मसात करावे,अनेक मुली व महिलांना आपली कला सर्वांसमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करावे तसेच मेकअप आणि सौन्दर्यांचे हे असंघटित क्षेत्र संघटित करून या क्षेत्रात काही उल्लेखनीय कर्तृत्व उभारावे या हेतुने निलिमा भोसले यांनी हे संमेलन आयोजित केले होते.
यावेळी सौंदर्य विश्व व कार्निवल कमिटी चे सर्व सदस्य,लेखिका जयश्री गोफने, लायन विजय जाजू आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच मनसेच्या शहर उपाध्यक्ष विशाखा गायकवाड़ या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी "महिलांनी या क्षेत्रात स्वावलंबी बनावे. चुल आणि मुल सांभाळून हा उद्योग सहज सांभाळता येतो व यातूनच व्यक्तिमत्वा सोबत व्यक्तित्वाचेही सौंदर्य खुलविनण्याचे आवाहन यांनी यावेळी केले.
हे संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी सखी मंच,लायन्स क्लब, संजीवनी संस्था, संकल्प एज्युकेशन आदींनी सहकार्य केले. राज्यस्तरीय पहिल्या संमेलनाला पुणेकर महिलांनी उत्साहात व जल्लोषात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना विशाखा गायकवाड यांनी या उपक्रमाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. नीलिमा भोसले आणि सौंदर्य विश्व च्या सर्वांना भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या ....

Post a Comment