संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करा ! गोविज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने मागणी
Posted by
vidarbha
on
10:00:00 PM
in
पुणे न्यूज
|
 |
उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
पुणे - संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी कायदा लागू करावा आणि त्याचे सक्तीने पालन व्हावे, अशी मागणी करणारे निवेदन गोविज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय घुले यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी गोभक्तांकडून स्वीकारले. या वेळी गोरक्षक संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय पांडेजी, समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे, शिरवी समाजाचे अध्यक्ष श्री. जीतारामजी चौधरी, ‘पीपल फॉर अॅनिमल, महाराष्ट्र’चे सदस्य श्री. मनोज ओसवाल, पुणे पांजरपोळचे विश्वस्त श्री. पुरुषोत्तम लढ्ढा, सामाजिक कार्यकर्ता श्री. राकेश मेहता, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता कमलेश शाह, गोभक्त श्री. मनोज गाला, गोभक्त श्री. हरिभाई तोडकर, वीरेंद्र पांडेय, ललित गलांडे, महेश मगर, देवीलाल चौधरी, कार्तिकी पवळे, सौ. मेघा ढोकरे आदींसह ३५ हून अधिक गोभक्त उपस्थित होते.
क्षणचित्र
वरील मागणीच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात ७ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नावे वरील आशयाची निवेदने देण्यात आली आहेत.
Post a Comment