पूज्यपाद आसारामजी बापू |
१. खटल्याविषयी पूज्य बापूजी आणि
प्रवक्त्या श्रीमती नीलम दुबे यांची प्रतिक्रिया
१ अ. षड्यंत्रकर्त्यांचे हात पुष्कळ मोठे आहेत ! - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू ‘पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात पूज्यपाद संतश्री बापूजी म्हणाले की, ‘‘तो (कृपाल सिंह) तर १२ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) साक्ष देऊन गेला. जे आक्रमणे करवून घेतात, त्यांचे अन्वेषण केले जावे. सत्य उजेडात येईल. माझी बाहेर निघण्याची वेळ येते, तेव्हा ते असे (साक्षीदारांच्या हत्या) घडवून आणतात. मी का असे करणार ? ज्यांनी मला येथे पाठवले आहे, तेच असे करवतात. त्यांचे हात लांब आहेत, मोठे षड्यंत्र आहे. देव सर्वांचे कल्याण करो.’’
१ आ. साक्षीदारच प्रत्यक्ष घटना सांगू शकत असल्यामुळे ते सुरक्षित रहाणे आवश्यक ! -श्रीमती नीलम दुबे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाच्या प्रवक्त्या श्रीमती नीलम दुबे म्हणतात, ‘‘जेव्हा जेव्हा पूज्य बापूजींना जामीन मिळण्याच्या शक्यता वाढतात, तेव्हाच साक्षीदारांवर आक्रमणे होतात. माझ्या मते साक्षीदार सुरक्षित रहाणे आवश्यक आहे; कारण साक्षीदार सुरक्षित राहिल्यानेच प्रकरणातील सत्य बाहेर येईल. तेच आहेत, जे स्पष्टपणे सांगतील की, कुणी कशा प्रकारे त्यांच्याकडून साक्ष वदवून घेतली आणि कशा प्रकारे लाचलुचपत दिली गेली ? कशा प्रकारे बापूजींना फसवण्याचा कट रचण्यात आला ?’’
२. पूज्य बापूजींची अटक म्हणजे हिंदु धर्माला
तुच्छ लेखण्यासाठी हिंदु संतांना अपकीर्त करण्याचा डाव !
कृपाल सिंह यांनी साक्ष देऊन जुलै २०१५ मध्ये एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. ते साक्ष देतांना बापूजी किंवा संस्था यांच्या विरुद्ध काहीही बोलले नाहीत. ज्यांना बापूजींना अपकीर्त करण्याचा ‘स्टंट’ करायचा असतो, असेच लोक कृपाल सिंह यांची हत्या वर्षभरानंतर करू शकतात. मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील अखिल गुप्ता अहमदाबाद प्रकरणात साक्षीदार बनला हेता. या प्रकरणात तक्रार नोंदवणार्या महिलेने न्यायालयात मान्य केले की, तिने कोणाच्यातरी दबावाखाली येऊन ती तक्रार नोंदवली होती. ती तिची पूर्वीची साक्ष पालटू इच्छिते, प्रकरणातील सत्य समोर आणू इच्छिते. मग अहमदाबाद खटल्यातील साक्षीदाराची आवश्यकताच भासली नसती. अशा प्रसंगी आम्ही साक्षीदारांना का मारू आणि मारायला सांगू ?
हिंदु धर्माला तुच्छ लेखण्यासाठी हिंदु संतांना अपकीर्त करण्याचा डाव आहे. भगवंताची नाही, तर ‘गॉड’ची तरी भीती बाळगा ! कर्माची गती गहन (गूढ) आहे. शेवटी दुष्कर्म करणार्यांना आणि ते करविणार्यांना तुच्छ योनीमध्ये जावेच लागते.’
संकलक : श्री. रू.भ. ठाकूर (मासिक ऋषिप्रसाद, ऑगस्ट २०१५)
Post a Comment