प्रमोद नैकेले /-
अचलपूर:-
पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत दिल्या
जाणा-या मोफत गँस कनेक्शन च्या वाटपात मोठा घोटाळा होत असल्याचे आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास बहुउद्दृशीय संघटना अचलपूर यांनी उघडकीस आणले आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाचा विचार करून दारीद्र रेषेखालील व विधवा परित्यक्ता माता भगिनींना मोफत गँस कनेक्शन देण्याची घोषणा केली त्यानुसार देशात उज्वला योजना आखण्यात आली याअंतर्गत दोन पध्दतीने गँस कनेक्शन देण्यात येणार आहेत.पूर्ण मोफत त्यांना सबसीडी मीळणार नाही तर १६०० रुपये भरून कनेक्शन घेणा-यांना सबसीडी देण्यात येईल असे या योजनेत म्हटले आहे पण प्रत्यक्षात
मोफत योजनेत प्रत्येकी १०० ते २०० व १६०० रुपयांचे एवजी १७०० ते २२०० रुपये घेतल्या जात आहेत तसेच ग्रामीण भागात भारत गँस एजंन्सीचे वितरक नसल्याने बडनेरा येथील काही एजंट अश्या भागात फीरून २२०० ते २६०० रुपये वसुल करून लोकांची लुबाडणूक करीत असल्याचे आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास बहुउद्देशीय संघटनेचे योगेश खानझोडे,प्रदिप चांदुरकर,सुरेश प्रजापती,मनोज कुंभारे प्यारेलाल प्रजापती व संघटनेचे कार्यकर्ते यांनी तहसिलदार अचलपूर यांना निवेदन देवून होत असलेल्या आर्थिक लुबाडणूकी पासून गोरगरिब जनतेचे रक्षण करावे व योग्य अंमलबजावणी करून योजनेचा लाभ जनतेला मिळवून द्यावा तसेच अशी फसवणूक करणा-यावीरूध्द कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे जर या लुबाडणूकीवर कार्यवाही झाली नाही तर लोकहितार्थ तिव्र आंदोलन करण्यात येईल असेही म्हटले आहे.

Post a Comment