परभणी / मोईन खान :-
- जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, 30 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 11.00 वाजता जिल्हाधिकारी, परभणी यांचे दालनात जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. जिल्हयातील कोणत्याही शासकीय/निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी पुराव्यासह नागरीकांना या समितीसमोर करता येतात. इतर सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती, परभणी यांच्या नावाने दिनांक 30 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारल्या जातील. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती, परभणी यांनी कळविले आहे.
Thursday, December 29, 2016
भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 30 डिसेंबर रोजी
Posted by vidarbha on 9:22:00 AM in परभणी / मोईन खान :- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment