वानखेड़ येथे शेतकऱ्यांच्या गोठ्यांना आग ,दोन लाखांचे नुकसान
Posted by
vidarbha
on
8:41:00 AM
in
बुलडाणा (दयालसिंग चव्हाण ) :-
|
बुलडाणा (दयालसिंग चव्हाण ) :-
संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथे गावलगत असलेल्या गोठ्यांना आग लागल्याची घटना 26 डिसेंबर रोजी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे 2 लाख रुपयाचे नुक़सान झाले आहे.
संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथील शेतकऱ्याच्या गोठयाला अचानक आग लागली . या आगीत गोठ्यातील कुटार, टिनपत्रे ,सोयाबीन पोते,ताड़पत्री,स्प्रिंकलर पाइप,व इतर शेती उपयोगी साहित्य जळुन खाक झाले आहे. या आगीमध्ये शंकर आखुड, सुरेश राजनकार ,भगवान हागे, जगन पंडरी हागे या चार शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
या आगीची माहिती मिळताच गावातील नागरिकानी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविन्यास सहकार्य केले. गोठे हे कुळाचे असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते.यामुळे चारही खोटे जळून ख़ाक झाले आहे.या घटनेची माहिती मिलताच तामगाव पो.स्टे.ठानेदार बि. आर.गीते,पोउनि कपिल शेळके,तहसीलदार,तलाठी यांनी घटनास्थळ दाखल होऊन पंचनामा केले.
Post a Comment