गवाणे, लांजा (रत्नागिरी) येथे हिंदूसंघटन मेळावा !
लांजा (रत्नागिरी) -
आज हिंदूंसमोर इसिस, जिहादी आतंकवाद, लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद अशी अनेक संकटे आवासून उभी आहेत. आज राष्ट्र टिकले, तर समाज टिकेल आणि समाज टिकला, तर आपण टिकू शकतो. देशासमोरील ही संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार याला प्रतिबंध करायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या जिल्हासेविका सौ. पल्लवी लांजेकर यांनी केले. तालुक्यातील गवाणे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. समीर घोरपडे यांनी केले. या मेळाव्याला १२५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आपला दोष आपण भव्य-दिव्य असे काही करत नाही, यात नसून आपल्या आवाक्यातीलही आपण करत नाही, यात आहे. म्हणूनच आता लक्ष्यप्राप्तीपर्यंत आपल्याला निकराचे शौर्य दाखवण्याची, प्रतिकारक्षम रहाण्याची आणि संघटित रहाण्याची आवश्यकता आहे. आजर्यंत तर जेवढी स्थित्यंतरे झाली आहेत, त्या वेळी महिलांवरील अत्याचार किंवा त्यांचा अपमान हे त्याला मूळ कारण ठरले. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे तरीही तिच्यावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे थांबायला हवे असेल, तर प्रत्येक स्त्रीला केवळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेली स्त्री नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम असलेली रणरागिणी व्हावे लागेल.
Post a Comment