BREAKING NEWS

Wednesday, December 14, 2016

परळी बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करन्यासाठी ०४ जानेवारी २०१७ पासून आमरण उपोषण

मोईन खान
/
परळी वैजनाथ /-- 



शहरातील बसस्थानक परिसरातील रस्त्यावर अनेक वर्षापासुन खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले. असून सदरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून वेळोवेळी होत असतांना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याकारणाने सदर मागणी पूर्ण करावी यासाठी समाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम दि.०४ जानेवारी २०१७ रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन परिवहन मंत्री यांना पाठविण्यात आले असून कदम यांच्या मागणीला अनेक पत्रकारांनी पाठींबा दर्शविला आहे.

परळी वैजनाथ हे शहर महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात व विदेशात राजकीय, धार्मिक, सामाजिक तथा शैक्षणिक व व्यापारी शहर म्हणून परिचत आहे. देशातील बाराज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असणारे श्री ॐ प्रभु  वैद्यनाथाचे येथे मंदिर असून देश विदेशातून त्यांच्या दर्शनासाठी लाखोभक्त शहरात येत असतात. यातील हजारो प्रवासी हे परिवहन मंडळाच्या बसने येत असतात. या शहरातील असणार्‍या बसस्थानकातून अनेक लांब पल्यांच्या बस धावतात व यामुळे मोठा आर्थिक फायदा परिवहन मंडळाला दरवर्षी मिळतो. मात्र या बसस्थानकाच्या परिसरात असणार्‍यां रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून त्याचा त्रास महिलावृध्द बालके यांना नाटक सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यांचे डांबरीकरण करावे अशी मागणी अनेक वेळा नागरिकाकडून व प्रवाशी वर्गाकडून करण्यात आलेली आहे. मात्र वाट कोणास ठावूक परिवहन खाते या मागणीकडे दुर्लभ करीत आहे. हे नागरिकांना तथा प्रवाशांना समजेनासे झाले आहे. म्हणून समाज हितासाठी, प्रवाशांच्या भल्यासाठी या बसस्थानक व आगार परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम हे दि.०४ जानेवारी २०१७ रोजी पासून आमरण उपोषण बसणार आहे. या आषयाचे निवेदन परिवहन मंत्री यांना परळी बसस्थानक आगारप्रमुख चौरे मार्फत दिले असून त्यांच्या प्रति, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते यांना पाठविण्यात आल्या आहेत. सदर उपोषणास पत्रकार रानबा गायकवाड, बालासाहेब फड, माणिक कोकाटे, भगवान साकसमुद्रे, अशोक मुंडे, चंद्रमणी वाघमारे, शेख मुकरम, गणेश आदोडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.