शेकडो शेतकरी प्रतीक्षेत
चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )
सविस्तर वृत्तानुसार स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितित नाफेड तर्फे उडीद या पिकाची खरेदी सुरु आहे. अतिशय अल्प दरात व तोही गाळून निवडून माल खरेदी करुण 8 दिवसाने खरेदी विक्री तर्फे चेक मिळणार या बोलिवर शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. परंतु 8 ते 10 दिवस उलटुनही मागील आठवड्यात माल विकलेल्या शेतकऱ्यांना अद्याप ही मालाचे पैसे न मिळल्याने त्यांनी खरेदी विक्री कड़े धाव घेतली तर खरेदी विक्रीत पैसे आले आहे. परंतु चेक बुक संपल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात वेळ होत असल्याचे समजते. या विषयी खरेदी विक्रिचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण 7 डिसेंबरलाच चेक बुक ची मागणी केली असून अद्याप बॅंकेकडून चेकबुक मिळाले नसल्याचे सांगितले. तर याविषयी स्टेट बॅंकेला विचारणा केली असता आपण चेक बुक साठी ची मागणी पाठवीली असल्याचे सांगून अधिक माहिती पोस्ट ऑफिस मधून मिळणार असल्याचे सांगितले. त्यावर पोस्ट ऑफिस मधून माहिती घेतली असता कालच चेक बुक निघाले असून 3 ते 4 दिवस लागणार असल्याचे समजले. नोटबंदी निर्णयापूर्वी 4 दिवसात मिळनारे चेक बुक मिळण्यात तब्बल 1 महीना लागत असून या सर्व प्रक्रियेत शेतकरी मात्र भरडल्या जात आहे हे विशेष.
Post a Comment