गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव खान्देश यांच्या तर्फे गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रासह आठ राज्यात व दोन देशात संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात येते यामध्ये महाराष्ट्राचे दहा लाख विद्यार्थी सहभागी झाले होते 2016/17 च्या परीक्षेचे अमरावती जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात करण्यात आले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव खान्देश दरवर्षी संस्कार परीक्षेचे आयोजन करीत असते या फाऊंडेशनचे जनक भवंरलाल जैन यांनी या परीक्षेची व फाऊंडेशनची मुहूर्तमेढ केली आज ही परीक्षा दोन देशासह आठ राज्यात होते.आज या फाऊंडेशनचे चेअरमन न्या.चद्रशेखर धर्माधीकारी हे या फाऊंडेशनला यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत.या फाऊंडेशनचा उद्देश महात्मा गांधी चे विचार युवावर्गापर्यंत पोहचवणे हा आहे जो आज गरजेचा आहे.सत्य व अहिंसा हे विचार अत्यावश्यक आहे कारण थोड्याश्या कारणाने निर्माण होणारी हिंसा आपल्याला घातक ठरणार आहे असे चंद्रशेखर पाटील समन्वयक यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले ते राष्ट्रीय विद्यालय अचलपूर येथे आयोजित अमरावती जिल्ह्यातील संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण समारंभात बोलत होते त्यांचे सहकारी सुधीर पाटील यांनी याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत जास्तीतजास्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची आज नितांत गरज आहे व हे कार्य हे फाऊंडेशन करीत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व जिल्हा स्तरीय बक्षीस वितरण समारंभ आमच्या शाळेत आयोजित करून या कार्यात आम्हाला सहभागी केल्या बद्दल धन्यवाद मानले याप्रसंगी जेष्ठ शिक्षक एम.के.येवूल यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रभारी शिक्षिका ममता तिवारी यांनी केले वर्ग 9 वी च्या श्रेयस विनोद निकम याला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच शाळेला मोमेंटो देवून सन्मानित करण्यात आले.गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी सुध्दा लावण्यात आली होती जिल्ह्यातील कोमल बायकर सर्वोदय हायस्कूल कोकर्डा,श्रीकांत गावंडे रत्नाबाई राठी हायस्कूल दर्यापूर,तनश्री खुजे राजुरा बाजार,अलफिया अंजुम वरूड,कोमल ठाकुर श्रीराम विद्यालय वडाळी,मोनाली चौधरी चांदूररेल्वे,श्रुती शर्मा पुर्णानगर,प्रेरणा थोरात अमरावती,श्रेयस निकम राष्ट्रीय हायस्कूल अचलपूर,अथर्व वानखेडे दर्यापूर,रिना भुसूम अमरावती,साक्षी भेले बोपापूर,रोशनी दहिकर हरिसाल,निकीता मिलके मालखेड रेल्वे,मोना उईके जरूड,नितीन गोपनारायण धामोडी,धिरज भावे हरिसाल,तेजस्विनी अडाळगे शिरजगांव बंड,अक्षय तायडे केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती,प्रगती इंगोले शिवाजी महाविद्यालय अमरावती,प्रशांत वाकोडे जे.डी.पाटील महा.दर्यापूर,योगीता भालेराव ,सुरज तायडे आदर्श महाविद्यालय धामनगाव रेल्वे व स्वप्नील रंगारी शिवाजी महाविद्यालय अमरावती यांना सुवर्ण,सील्व्हर व ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांचे हस्ते देण्यात आले कार्यक्रमाला सर्व शाळेचे प्रभारी शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक त्यांचे सोबत उपस्थीत होते कार्यक्रमांला यशस्वी करण्यासाठी चेतन शर्मा,महेश शेरेकर,कैलाश बद्रटीये,सागर मानमोडे,राजु केदारे कैलाश गायकवाड सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.
Post a Comment