राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जंयती विद्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले प्रमुख अतिथी भारत नकाशे,राधिका बैस,एम.के.येवूल व दिलीप बोबडे उपस्थीत होते.जिजामाता व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून दोन्ही विभूतींच्या जिवनावर मार्गदर्शन करतांना वक्त्यांनी सांगीतले की राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सारखे शुरवीर व कुशल नेतृत्व करणारे राजे दिले त्यांनी बालपणी शिवाजी महाराजांना युध्दनितीचे धडे दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शनाखाली दिले तर युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे बद्दल माहिती देतांना प्रमुख वक्त्यांनी त्यांचे जीवनावर सांगतांना म्हटले की स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३ विवेकानंदांचा जन्म झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते. कॉलेज शिक्षण
नरेंद्ररनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्ट ची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इ. विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी त्यांच्याबद्दल लिहितात : “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.तर
विवेकानंद नामकरण राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले. विवेकानंद यांनी देशालाच नाही तर संपूर्ण जगाला शांततेचा व समानतेचा संदेश दिला.न्यूयॉर्क मधील शिकागो येथे माझ्या बंधूनो व भगिनींनो अशी भाषनाची सुरवात करून संपूर्ण जग जिंकले असे आपल्या मार्गदर्शनात सांगीतले व आपण त्यांचे चित्र पाहण्यापेक्षा चरीत्र पहावे असा संदेश आर.डी.बैस,बि.आर.नकाशे,ए.व्ही.कोल्हे,सी.व्ही.शर्मा,एम.एस.तिवारी.डि.एम.बोबडे आदींनी दिला,विद्यार्थ्यांनी सुध्दा यावेळी आपली मते मांडली कार्यक्रमाचे संचलन एस.आर.अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन एम.के.येवूल यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.
Post a Comment