परभणी / मोईन खान :-
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण 2017 दिनांक 11 जानेवारी 2017 रोजी रात्री 7.30 वाजता बसस्टॅन्डच्या आतमध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता कामकामगारच्या वतीने साफसफाई करण्यात आली. मनपाच्या वतीने सकाळी 5.30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दुपारी 2 ते 4 यावेळेत तसेच सायंकाळी 7.30 ते 10 वाजेपर्यंत स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील शासकीय कार्यालय व रहदारीच्या ठिकाणी बसस्टॅन्ड, रेल्वेस्टेशन, सिव्हील हॉस्पीटल, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. यासाठी परभणी शहर नगरपालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान, मिर शाकेर अली, धाबेकर, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, कुरा, मेहेराज अहेमद, अशोक स्वामी, राजु झोडपे, के.बी.हैबते तसेच मनपाचे कर्मचारी शहरामध्ये स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शहरातील नागरिकांनी आपल्याकडे घंटागाडी येत नसेल किंवा साफसफाई झाली नसेल तर स्वच्छता ऍप डाऊनलोड करून त्याचा फोटो काढून पाठवावा. 24 तासात त्याचे निराकरण करण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Friday, January 13, 2017
महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण
Posted by vidarbha on 7:36:00 AM in परभणी / मोईन खान :- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment