परभणी / मोईन खान /-,
निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ व राज्यातील १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर निवडणूक होणाऱ्या औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण आणि नाशिक या पाच विभागामध्ये आदर्श आचारसहिंता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही पण या नियमानुसार सर्वच सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व पेट्रोलपंपावर लावलेले आहे. सर्व राजकीय पक्षासाठी एकच नियम आहेत. या नियमानुसार प्रशासनाने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे सर्व फलक काढले आहेत पण सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती या पाचही विभागामधील पेट्रोलपंपावर लावलेले आहेत. यासोबत महाराष्ट्र शासनाकडून राज्य परिवहन विभागाची बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके वर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. या सर्वासोबतच आचारसहिंता लागू असलेल्या सर्व ठिकाणाच्या सरकारी जाहिराती काढण्याचे तात्काळ स्थानिक आदेश प्रशासनाला दयावेत.
सुहास पंडित
मीडिया जिल्हा अध्यक्ष
परभणी जिल्हा कॉंग्रेस कमिटी
Post a Comment