जकातवाडी (जिल्हा सातारा)
– भारतातील काश्मिरी बांधवांचे २६ वर्षांनंतरही पुनर्वसन झालेले नाही. हिंदूंची सहस्रो मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत; परंतु मशिदी आणि चर्च यांचे नियंत्रण करणार्या वक्फ बोर्ड आणि डायासेशन सोसायटी यांना सरकार हातही लावत नाही. हिंदूंनी मंदिरात दान केलेले पैसे अन्य धर्मियांवर सवलतींची खैरात करण्यासाठी उधळले जात आहेत. हज यात्रेला अनुदान देण्यात येते; परंतु हिंदूंच्या अमरनाथ आणि मानससरोवर यात्रांवर मात्र कर आकारला जातो. हा बेगडी सर्वधर्मसमभावच हिंदूंच्या जिवावर उठला आहे. हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हणमंत कदम यांनी केले. ते ६ जानेवारीला जकातवाडी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी उपस्थित हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सज्ज असल्याचे सांगत संघटित प्रयत्न करण्याचा निश्चय केला.
श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हणमंत कदम यांचा सत्कार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. जनार्दन भोसले यांनी केला. रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा सत्कार सरपंच सौ. सीता जाधव यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे श्री. वैभव क्षीरसागर यांनी सांगितला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. सभेला १५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
Post a Comment