चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी परीसरात सगळीकडे ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्थानिक नगर परीषदेमध्येसुध्दा पार पडला. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका दरवर्षी नगर परीषद प्रशासनामार्फत शहरातील जेष्ठ नागरीक, माजी नगरसेवक, ठेकेदार व इतर प्रतिष्ठीतांना देण्यात येते व शहरातील प्रतिष्ठीतही कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहतात. मात्र सद्यस्थितीत वादग्रस्त ठरत असलेले मुख्याधिकारी सुमेध अलोने यांना या प्रतिष्ठीतांचा विसरच पडला. कारण या वर्षी एकाही प्रतिष्ठीताला निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली नाही. त्यामुळे नगर परीषदमधील कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. चांदुर रेल्वे मध्ये कित्येक महिन्यापासुन प्रभारी मुख्याधिकारी असुन ते केवळ ३ दिवस नगर परीषदेमध्ये हजर असतात. यामुळे शहरातील अनेक कामेसुध्दा खोळंबली आहे. अशातच आता मुख्यालयीन मुख्याधिकाऱ्याची चांदुर रेल्वे शहरात आवश्यकता आहे..
आंचारसहितेचे दिले कारण -
या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की जिल्हा परीषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे नगर परीषदच्या पत्रिका छापण्यात आल्या नाही. मग आचारसंहितेचे कारण तर प्रत्येक कार्यालयाला असायला पाहिजे. पंचायत समिती, तहसिल कार्यालयातर्फे पत्रिका छापुन निमंत्रण देण्यात आले तर नगर परीषदेतर्फे प्रतिष्ठीत नागरीकांना निमंत्रण का देता आले नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांना कशाची आचारसंहीता हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
Post a Comment