चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सम्मेलनाचे उद्घाटन होणार आहे. या सम्मेलनाचे सम्मेलनाध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद देशमुख राहणार आहे. तसेच उद्घाटक म्हणुन शिवाजी महाविद्यालयाचे मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. डॉ. कुमार बोबडे तर प्रमुख अतिथी म्हणुन आमदार विरेंद्र जगताप, यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर व स्वागताध्यक्ष म्हणुन नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टु सुर्यवंशी राहणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता "कॉलेज कवी थट्टा" चे आयोजन करण्यात आले आहे. तर तिसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सदानंद देशमुख राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डॉ. कुमार बोबडे, प्रमोद बाविस्कर, जयंतराव शेटे व श्रीमती मंगलाताई माळवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तसेच चवथ्या शेवटच्या सत्रात निमंत्रितांचे कवी सम्मेलन सायंकाळी ७ वाजता आयोजित केले आहे. या कवी सम्मेलनाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास दामले हे राहणार आहे. यांसोबत यवतमाळ येथील प्रमोद बाविस्कर, जयंतराव शेटे, श्रीमती मंगलाबाई माळवे, अमरावती येथील मंगेश वानखडे, विष्णु सोळंके, धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथील ललित सोनोने, चांदुर बाजार येथील नितीन देशमुख, विजय सोसे, परतवाडा येथील लोककलावंत कैलाश पेंढारकर व अचलपुर येथील गजानन मते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
तरी तालुकावासियांनी आयोजित सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहुन नववर्षारंभाचे हे अक्षरपर्व आनंद व उत्साहात साजरे करण्यास सहकार्य करावे असे आवाहन चांदुर रेल्वे शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परीषदचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रशांत ठाकरे, नानासाहेब डोंगरे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, कोषाध्यक्ष खुशाल गुल्हाने, सहकोषाध्यक्ष प्रमोद भागवत, कार्याध्यक्ष अैड. राजीव अंबापुरे, सहसचिव संजय चौधरी, सदस्य प्राचार्य विश्वास दामले, प्रा. प्रसेनजित तेलंग, दिपक सोळंके, पत्रकार अमोल गवळी, विवेक राऊत, प्रा. निशा जोशी, कविता कटकतलवारे, गोकुल रॉय, प्रतापसिंह खंडार, उज्वल पंडेकर, भूषण नाचवनकर, अजय वाघ, प्रा. राहुल तायडे, धिरज जवळकर, दिपीका बाजपेयी, अमोल म्हसतकर आदींनी केले आहे..
Post a Comment