चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
आजच्या धकाधकीच्या जिवणात समाजोपयोगी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान क्वचितच होतो. मात्र स्थानिक पत्रकार बंधू अशा बाबी हेरूण त्यांचा यथोचित सत्कार करतात. त्यांच्या कार्याची दखल घेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत असतात. अशाचप्रकारे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रचार्य विश्वास दामले यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या कित्येक दशकापासुन शासकीय कार्यक्रमांचे संचलन करणारे त्यात २६ जानेवारी असो की १५ ऑगस्ट असो अशा कार्यक्रमा सोबतच इंग्रजी शिक्षणाची चांदुर रेल्वे शहरात मुहुर्त मेढ रोवणारे, लिटील स्टार इंग्लीश स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य विश्वासजी दामले यांच्या भरीव कार्याची दखल आतापर्यंत कोणीही घेतलेली नाही. मात्र हिच बाब हेरूण स्थानिक अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेने २६ जानेवारी रोजी स्थानिक जिल्हा परीषद हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे यांच्या हस्ते तसेच तहसिलदार राजगडकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राचार्य विश्वास दामले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
स्थानिक पत्रकारांच्या या उपक्रमाबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांनीही तोंड भरून कौतुक केले. यावेळी पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी कु. सोनाली माडकर, गटशिक्षणाधिकारी इंगळे, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, सर्व नगरसेवकांसह, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सचिव रविंद्र मेंढे, कोषाध्यक्ष मनिष खुने, सदस्य प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, युसुफ खान, बाळासाहेब सोरगिवकर, अमोल गवळी, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, मंगेश बोबडे, विवेक राऊत, शहेजाद खान, मधुकर बावने, अमर घटारे, प्रा. सुधिर तायडे, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजय गावंडे, हनुमंत मेश्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Saturday, January 28, 2017
अ.भा.ग्रा. पत्रकार संघटनेतर्फे प्राचार्य विश्वास दामले यांचा सत्कार
Posted by vidarbha on 5:10:00 PM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment