तुळजापूर (जिल्हा धाराशिव)–
येथे शुक्रवार, २७ जानेवारी या दिवशी श्री भवानी मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘नवचंडी यज्ञ’ करण्यात आला. या यज्ञाचे यजमानपद धाराशिव येथील साधक श्री. शरद गणेश आणि सौ. मंगला शरद गणेश यांनी, तर यज्ञाचे पौरोहित्य श्री. नागेश शास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांनी केले. या यज्ञाच्या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, सर्व साधकांचे शारीरिक अन् आध्यात्मिक कष्ट दूर व्हावेत, हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत’, यासाठी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे हा यज्ञ करण्यात आला होता. हा यज्ञ भावपूर्ण आणि उत्साहात पार पडला. यज्ञ पार पडल्यानंतर सायंकाळी श्री भवानीदेवीला अभिषेक, महापूजा आणि प्रार्थना करण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. यज्ञाच्या ठिकाणी सर्वांना श्री भवानीदेवीचे अस्तित्व जाणवले.
२. २६ जानेवारीला यज्ञाचा संकल्प करतांना श्री भवानीदेवीकडून पांढरी सुपारी साधकाजवळ पडली. याद्वारे देवीने साक्ष दिल्याचीच अनुभूती साधकांना आली.
Post a Comment