यवतमाळ –
येथील न.प. शाळेतील (आझाद मैदानाजवळ) मुलांना थोर क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. श्री. विवेक बेळगांवकर यांनी क्रांतीलढ्याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. शेखर गुल्हाने यांनी क्रांतिलढ्यातील नेताजींच्या बहुमूल्य योगदानाचे वर्णन केले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्ता फोकमारे यांनी विद्यार्थ्यांना स्वभावदोष निर्मूलन आणि गुणवृद्धी यांची आवश्यकता विशद केली. या मार्गदर्शनाचा लाभ शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेतील शिक्षकांनी सनातनच्या दोष घालवा, गुण जोपासा या ग्रंथांचे कौतुक करून पाच प्रतींची मागणी केली.
Post a Comment