प्रमोद नैकेले :-( अचलपूर ) -
शहरातील इदगाहमैदानावर व्यंकटेश हायस्कूल समोर सामुहिक मुस्लिम विवाह चे आयोजन सिराते मुस्ताकिम तनज़िम के साबिरऊल काद्री द्वारा करण्यात आले. ज्या मध्ये 6 जोडप्यांचा निकाह करण्यात आला. यावेळी शे कलिम शे नुर अचलपूर,.सुलेमान शा .करिम शा तलेगाव मोहना,रइस बेग.रऊफ़ बेग.सिरजगाव,सोहेल शा किसमत शा. तलेगाव मोहना.जामिल शाह. सुलेमान शा सिंधी बू.,अमीर खा. सजिद खा खंडवा,यांचा निकाहा मुफ्ती गुलाम समदानी यांनी लावला सोबतच या मैदानावर इज्तेमा चे सुध्दा अयोजन करण्यात आले ज्यामध्ये मुफ्ती हफिज उल्लाह काद्री यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की मुस्लिम माश-यामध्ये वाढत असलेली वाईट प्रवृत्तींना नष्ट करून विवाहात होत असलेल्या निरर्थक खर्च न करता इस्लामी रितीरिवाजानुसार साधेपणाने वीवाह करावा.मोलाना मकसुद रज़ा यांनी म्हटले की शहरातील हा पहिला प्रसंग आहे की इश्तेमा सोबत येथे इजतेमा विवाहाचे आयोजन करण्यात आले.त्या सर्व लोकांचे कौतूक व अभिनंदन ज्यांनी हे आयोजन यशस्वीपणे केले. या इज्तेमा व वीवाह प्रसंगी खातिब ए शहर सै अबरार हुसेन मुफ्ती गुलाम समदानी मोलाना मकसूद रज़ा हाफिज़ अ रहीम.हाफिज़ मो कलिम सबिरऊल काद्री उपस्थित होतेे या इज्तेमा विवाह ला यशस्वी करण्यासाठी हफिज़ खां,पत्रकार फिरोज़ खान. अज़ींम बेग.पत्रकार मो अज़हरउद्दिन..माहमुद खा.रहीम खा .निसार खान.शे रशीद..शे रउफ़..शे रफीक, मोलाना इम्रान खान.. इर्फान खान.यांनी प्रयत्न केले सर्वांनी व्यंकटेश शाळेचे अध्यक्ष तारे सर यांचे आभार मानले बाहेरून आलेल्या व विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे जेवणाची सुध्दा मोठया प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती.
Monday, January 9, 2017
अचलपूर मध्ये सामुहिक मुस्लिम वीवाह संपन्न सिराते मुस्ताकिम तनज़िम .गाज़ी फाउनडेशन तर्फे समुहिक वीवाह इज्तेमा चे आयोजन*
Posted by vidarbha on 8:36:00 PM in प्रमोद नैकेले ( अचलपूर ) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment