चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी महेश शामसुंदर कलावटे यांची निवड झाली.तर सदस्य म्हणून शारदा नरेंद्र मेश्राम, स्वाती शैलेंद्र मेटे, शुभांगी अविनाश वानरे, निलीमा विष्णुकांत शर्मा यांचा समावेश आहे. शिक्षण व स्वच्छता, आरोग्य समितीच्या सभापतीपदी सतपाल भाऊराव वरठे यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून कल्पना राजकुमार लांजेवार, स्वाती सुजित माकोडे, दिपाली विजय मिसाळ, निलीमा विष्णुकांत शर्मा यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा समितीच्या सभापती म्हणुन प्रवन निवृत्तीनाथ भेंडे तर सदस्य म्हणून शारदा नरेंद्र मेश्राम, वैभव गायकवाड, संजय पुरसाम, व बच्चु वानरे यांचा समावेश आहे. महिला व बाल कल्याण सभापतीपदी शबाना परविन अब्दुल हमीद व उपसभापतीपदी स्वाती सुजित माकोडे यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून स्वाती शैलेंद्र मेटे व सुरेखा विलास तांडेकर यांचा समावेश आहे.नियोजन व विकास समितीच्या पदसिध्द सभापती म्हणून न.प.उपाध्यक्ष देवानंद खुने व सदस्य म्हणून शुभांगी अविनाश वानरे, वैभव गायकवाड, संजय मोटवानी, संजय पुरसाम यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे पदसिध्द सभापती नगराध्यक्ष शिट्टू उर्पâ निलेश सुर्यवंशी असुन सदस्य म्हणून पाच विषय समितीचे सभापती न.प.उपाध्यक्ष देवानंद खुने, महेश कलावटे, सतपाल वरठे, प्रवन भेंडे, शबाना परविन अब्दुल हमीद हे राहणार आहे. विषय समितीच्या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी श्री ललित वऱ्हाडे यांनी काम पाहिले.तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी सुमेद अलोने, अधिक्षक धनराज गजभिये यांनी काम पाहीले. विषय समितीच्या निवडणूकीच्या वेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Post a Comment